26_04_29

१ मेच्या आंदोलनाला ‘पोलीस हक्क संघर्ष संघटना’चा जाहीर पाठिंबा

 बीड़ येथे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या न्याय व संरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात संघटनेचा सक्रिय सहभाग; शांतता आणि न्यायासाठी पूर्ण सहकार्याची घोषणा

बीड हलचल: अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी १ मे रोजी बीड़ येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक आंदोलनाला ‘पोलीस हक्क संघर्ष संघटना’ने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष शेख जावेद जाफर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. समाजात शांतता, सुरक्षा आणि न्याय प्रस्थापित व्हावा ही संघटनेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर संबंधित आंदोलनात संघटनेचा सक्रिय सहभाग राहणार असून, आंदोलनकर्त्यांना पूर्ण सहकार्य देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.


No comments:

Post a Comment

इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

  बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी  बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...