बीड़ येथे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या न्याय व संरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात संघटनेचा सक्रिय सहभाग; शांतता आणि न्यायासाठी पूर्ण सहकार्याची घोषणा
सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणारी पत्रकारिता सत्य लपणार नाही… बीडची बातमी थेट तुमच्यापर्यंत ✍️
26_04_29
१ मेच्या आंदोलनाला ‘पोलीस हक्क संघर्ष संघटना’चा जाहीर पाठिंबा
26_04_28
शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना विधानपरिषदेत आमदार म्हणून निवड करा – कमरान खान यांची आघाडीची मागणी
परभणी – महाराष्ट्र राज्यात सध्या विधानपरिषदेत रिक्त जागांसाठी सदस्यांची नियुक्ती होणार असून, या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे नाव जोरदार चर्चेत आहे.
26_04_02
नाझिया नुरूल हुसेन यांना अखेर न्याय; पोलीस हक्क संघर्ष संघटनेकडून अभिनंदनाचा वर्षाव
जेबा मॅम (संस्थाध्यक्षा), कदीर साहेब (उपसंस्थाध्यक्ष) व जिल्हाध्यक्ष शेख जावेद यांची प्रतिक्रिया; न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त
नाझिया नुरूल हुसेन यांना न्याय मिळाल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत असून, पोलीस हक्क संघर्ष संघटनेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. या प्रकरणात न्याय मिळाल्यामुळे संबंधित कुटुंबास मोठा दिलासा मिळाला आहे.संस्थाध्यक्षा जेबा मॅम, उपसंस्थाध्यक्ष कदीर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष शेख जावेद यांनी नाझिया यांना शुभेच्छा देत हा न्यायाचा विजय असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, अन्यायाविरोधात लढा देणाऱ्यांना हा निर्णय प्रेरणादायी ठरणार आहे.
या घटनेमुळे समाजात न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला असून, अन्यायग्रस्तांना पुढे येऊन आपले हक्क मिळवण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
26_04_01
पाली (बीड) येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; शेतात काम करताना ६२ वर्षीय वसंत राऊत यांचा जागीच मृत्यू
बीड जिल्ह्यात आज दुपारी अचानक वातावरणात मोठा बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड शहरालगत असलेल्या पाली गावात सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली. शेतात काम करत असताना वसंत रामराव राऊत (वय ६२) यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे पाली गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महसूल प्रशासन पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेली पिके वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत
बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...
-
महाकाळा येथे पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबणे ठरले जीवघेणे अंबड तालुक्यातील महाकाळा येथे थोड्याच वेळापूर्वी वीज कोसळून दोन तरुणांचा जा...
-
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; शेतात काम करताना ६२ वर्षीय वसंत राऊत यांचा जागीच मृत्यू बीड जिल्ह्यात आज दुपारी अचानक वातावरणात मोठा बदल हो...
-
गुन्ह्यानंतर राज्याबाहेर पसार झालेल्या आरोपीला बीड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पकडले बीड, दि. ३ (प्रतिनिधी) – खून करून फरार झालेल्य...





