Monday, March 30, 2026

अंबड तालुक्यात वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू; एक जखमी

 महाकाळा येथे पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबणे ठरले जीवघेणे

अंबड तालुक्यातील महाकाळा येथे थोड्याच वेळापूर्वी वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21 वर्ष) व आदित्य दगडू बेद्रे (वय 20 वर्ष) हे दोघे तरुण पावसामुळे लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याच दरम्यान अचानक त्या झाडावर वीज कोसळली.
या भीषण घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत असलेला आणखी एक तरुण गंभीररीत्या भाजला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
ही घटना साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती, महाकाळा येथे घडली आहे.
दरम्यान, बीड जिल्हा व आसपासच्या परिसरात सध्या वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी व अशा वेळी झाडाखाली थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

  प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासन...