बीड (प्रतिनिधी) दरवर्षी शहराच्या मध्यास्थानी बशीर गंज भागात मीना बाजार लावले जाते शहराच्या रहदारीच्या ठिकाणी असल्याने या भागात मोठी गर्दी उसळते आस पास च्या परिसरात दवाखाने,शाळा ,बँका , अग्निशामक दल, मरकज,असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोकांची ये जा असते मात्र मीना बाजार लावल्याने हा परिसर अत्यंत गजबजून जातो व वाहतुकीसह रस्त्यावर गर्दी उसळते जेणे करून शाळा महाविद्यालय बँकेत येणाऱ्या विद्यार्थी वर्गासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो सध्या शहर पोलिस ठाणे देखील त्याच मार्गावर असल्याने त्यांना देखील आरोपींना कोर्टात नेण्यासाठी तोच मार्ग अवलंबवावा लागतो मीना बाजार लागला तर तो रस्ता पूर्णपणे बंद होतो शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना देखील याचा त्रास होईल त्या सह पवित्र रमजान सुरू असल्याने जिल्ह्याचे मरकज त्याच ठिकाणी आहे मरकज मध्ये कुराण पठाण ,नमाज सह इतर धार्मिक कार्यक्रम असतात ही धार्मिक कामे करणाऱ्या लोकांना ही याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो या सह विविध समस्या या मीना बाजार मुळे उद्भवतात म्हणून मां जिल्हाधिकारी बीड ,मुख्याधिकारी नगर परिषद यांना आमची कळकळीची विनंती आहे त्यांनी रहदारीच्या रस्त्यावर अशा पद्धतीने परवानगी देवू नये जेणे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल असे म्हणून या मीना बाजार ला परवानगी देवू नये अशी मागणी समाजसेवक मोमीन सोफियान यांनी पत्रकाद्वारे केली आहे


No comments:
Post a Comment