26_03_29

खंडणी व जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात शेख इम्रान (𝗟𝗮𝗹𝗮) शेख राशिद यांना न्यायालयातून निर्दोष मुक्तता

 पुराव्याअभावी कोर्टाचा निर्णय; सर्व आरोपींना मोठा दिलासा, सरकारी पक्षाला केस सिद्ध करण्यात अपयश  

बीड हलचल | प्रतिनिधी बीड येथील खंडणी मागणी व जीवघेण्या हल्ल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी अखेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत शेख इम्रान (𝗟𝗮𝗹𝗮) शेख राशिद यांच्यासह इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.


माहितीनुसार, बीड शहरातील मोमीन अकबर (बाटलीवाला) यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादीकडून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून संबंधित आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

सदर प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून सुमारे १० साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सादर करण्यात आलेले पुरावे व साक्षी हे ठोस नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. परिणामी, आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला.

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय देताना शेख इम्रान (𝗟𝗮𝗹𝗮) शेख राशिद यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता जाहीर केली.

या प्रकरणात बचाव पक्षाच्या वकिलांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत आरोपींच्या बाजूने मजबूत भूमिका मांडली. अखेरीस न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींना क्लीन चिट 

दिली.






No comments:

Post a Comment

इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

  बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी  बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...