26_03_22

लहान वयात मोठा जिद्द — ९.५ वर्षांच्या फरझीन फातिमाचे संपूर्ण रमजानचे रोजे

 

बीड (हलचल): आजच्या काळात लहान मुले मोबाईल आणि खेळांमध्ये अधिक रमलेली दिसतात, मात्र बीड येथील फरझीन फातिमा फिरोज मोमीन या चिमुकलीने आपल्या दृढ निश्चयाने आणि धार्मिक आस्थेने एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

फक्त ९.५ वर्षांच्या वयात फरझीनने यंदा संपूर्ण रमजान महिन्यातील सर्व रोजे पूर्ण केले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीदेखील वय केवळ ८.५ वर्षे असताना तिने संपूर्ण रमजानचे रोजे ठेवून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

इतक्या लहान वयात रोजा पाळणे सोपे नसते, मात्र फरझीनची सहनशक्ती, जिद्द आणि चिकाटी खरोखरच कौतुकास्पद आहे. यामध्ये तिच्या पालकांची उत्तम संस्कार आणि प्रोत्साहन यांचा मोठा वाटा आहे.

फरझीनचा हा आदर्श केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण बीड शहरासाठी अभिमानाची बाब आहे. तिची ही कामगिरी इतर मुलांसाठी आणि पालकांसाठीही एक प्रेरणादायी संदेश देणारी ठरत आहे की, योग्य मार्गदर्शन आणि चांगले संस्कार मिळाल्यास लहान वयातही मोठे यश मिळवता येते.



No comments:

Post a Comment

इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

  बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी  बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...