बीड पोलीस बदल्यांचा धडाका! शितलकुमार बल्लाळ शिवाजीनगर ठाण्याचे प्रभारी | अचानक बदलामुळे चर्चा
बीड (प्रतिनिधी): बीड जिल्हा पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर आज ठाणे प्रमुखांच्या स्तरावर मोठी खांदेपालट करण्यात आली. या बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या बदलीचा विषय विशेष चर्चेत राहिला. सकाळी जारी झालेल्या आदेशानुसार त्यांची बदली केज येथे झाल्याची माहिती समोर आली होती. तर केज येथील पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांची बदली बीडमधील शिवाजीनगर येथे करण्यात आली होती.
मात्र दुपारपर्यंत या निर्णयात अचानक बदल करण्यात आला आणि शितलकुमार बल्लाळ यांचीच बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली. या अनपेक्षित बदलामुळे पोलीस विभागात तसेच नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस निरीक्षक बल्लाळ हे शिस्तप्रिय, कडक आणि कामात काटेकोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणी प्रभावी कारवाई करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलाच धसका निर्माण झाला होता.
दरम्यान, जिल्ह्यातील या बदल्यांमुळे प्रशासनातील हालचालींना वेग आला असून, पुढील काळात या बदलांचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment