Thursday, March 5, 2026

एप्रिलपासून महाराष्ट्रात S.I.R. मोहीम; शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे आवाहन

 

बीड (प्रतिनिधी): देशातील १२ राज्यांमध्ये सुरू झालेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (S.I.R.) मोहिमेची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात होणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे बीड जिल्हाप्रमुख कमरान खान यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

कमरान खान यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या ओळखीच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी यापैकी कोणतेही एक वैध कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रांच्या आधारे मतदारांची ओळख कायदेशीररित्या ग्राह्य धरली जाणार आहे.

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची उपस्थिती असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, S.I.R. प्रक्रियेदरम्यान बी.एल.ओ. (Booth Level Officer) यांना सहकार्य करावे आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत.

आवश्यक कागदपत्रे (यापैकी कोणतेही एक)

जन्म प्रमाणपत्र

पासपोर्ट

पेन्शन प्रमाणपत्र

एलआयसी प्रमाणपत्र

शैक्षणिक प्रमाणपत्र

कायमस्वरूपी रहिवासी दाखला

वनहक्क प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

कुटुंब नोंद वही प्रत

जमीन/घर वाटप प्रमाणपत्र

बी.एल.ओ. घरभेटीद्वारे पडताळणी करणार असून, २००२ च्या मतदार यादीच्या आधारे माहिती तपासली जाणार आहे. नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment

बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

  प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासन...