26_03_19

आझाद सिनिअर कॉलेज, औसा येथे “Teacher’s Professional Ethics” विषयावर एकदिवसीय परिसंवाद उत्साहात

 

औसा : आझाद सिनिअर कॉलेज, औसा (बी.एड) महाविद्यालयामध्ये “One Day Seminar on Professional Ethics for Teacher’s” या महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादामध्ये शिक्षकांनी व्यावसायिक नीतिमत्ता कशी जपावी, विद्यार्थ्यांशी कसे वागावे तसेच शिक्षण क्षेत्रातील जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आझाद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. के. सय्यद सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बलीद मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने बी.एडचे विद्यार्थी उपस्थित राहून या परिसंवादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले असून विद्यार्थ्यांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



No comments:

Post a Comment

इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

  बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी  बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...